प्रकरण ४ - विंडो - संगणकीय परिचय (Window)
विंडोचा शब्दश: अर्थ खिडकी असा होतो. परंतु संगणकीय परिभाषेत ग्राफीकल युजर इंटरफेस वापरतांना प्रोग्राम साठी आवश्यक असणारे मेनू, रिबन, टूल्स इ. सुव्यवस्थितपणे संरचित केले जातात. ते ज्या चौकटीमध्ये दर्शविले जातात, त्या चौकटीला "विंडो" असे म्हणतात.
विंडोची एक रचना असते, ती खालीलप्रमाणे -
१. टायटल बार -
जगातील कुठलाही प्रोगाम किंवा विंडो ओपन झाल्यानंतर त्याला एक टायटलबार असतो. जो त्या विंडोची माहीती देत असतो.
टायटलबार वर प्रामुख्याने प्रोग्रामचे नाव तसेच फाईलचे नाव दर्शविले जाते. त्याच बरोबर उजव्या कोपऱ्यामध्ये तीन बटणांचा समावेश केला जातो.
अ. मिनिमाईज -
या बटणाचा उपयोग सुरु असलेला प्रोग्राम बंद न करता टास्कबारवर छोट्या रुपामध्ये रुपांतरीत करण्यासाठी होतो. तसेच संबंधित प्रोग्राम पुन्हा ओपन करावयाचा असल्यास टास्कबार वरील प्रोग्रामच्या छोट्या मिनिएचरवर क्लिक करुन पुन्हा उघडता येतो.
ब. रिस्टोअर डाऊन/ मॅक्सिमाईज :-
रिस्टोअर डाऊन या बटणाचा उपयोग प्रोग्राम विंडो छोटी करण्यासाठी केला जातो.
तर रिस्टोअर डाऊन केलेल्या विंडोवर रिस्टोअर डाऊनच्या जागी मॅक्सिमाईज हे बटण सक्रीय होते. त्याचा उपयोग संबंधित विंडो पुन्हा मोठ्यात मोठी करायची असल्यास होतो.
क. क्लोज :-
हे बटण प्रोग्राम पूर्णपणे बंद करण्याठी होतो.
२. मेनू बार -
संगणकातील प्रत्येक प्रोग्राम हा कुठल्या ना कुठल्या उद्देश्य पूर्तीसाठी डिझाईन करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रोग्राममध्ये उपलब्ध सुविधा दर्शविण्यासाठी एक मेनुबार डिझाईन केलेला असतो. जो आपणांस प्रोग्राम मध्ये असणारे कृती घटक दर्शविण्याचे काम करत असतो. प्रत्येक प्रोगामला मेनु बार असतो, परंतु प्रत्येक प्रोग्रामच्या मेनूबारमधील घटक हे भिन्न असतात.
३. रिबन :-
एखाद्या मेनुवर क्लिक केल्यास त्या मेनुमधील घटक एका मोठया जाड पट्टीवर/बारवर दर्शविले जातात, त्या बारला रिबन असे म्हणतात. रिबन ही विविध ग्रुपची मिळून बनलेली असते. तसेच प्रत्येक ग्रुपमध्ये एक्शन बटन्स असतात.
४. होरिझोंटल रुलर -
हा रुलर पानाची रुंदी किती आहे, तसेच पानाची डावी आणि उजवी मार्जिन किती आहे, हे दर्शविण्याचे काम करतो.
५. व्हर्टीकल रुलर -
हा रुलर पानाची उंची किती आहे, तसेच पानाची टॉप आणि बॉटम मार्जिन किती आहे, हे दर्शविण्याचे काम करतो.
६. व्हर्टीकल स्क्रोल बार -
हा बार पानाला व्हर्टीकल म्हणजेच खाली-वर सरकविण्यासाठी मदत करतो.६. ७. ७. होरिझोंटल स्क्रोल बार -
हा बार पानाला होरिझोंटली म्हणजेच डावीकडे -उजवीकडे सरकविण्यासाठी मदत करतो.
८. स्टेटस् बार -
प्रत्येक प्रोग्रामला प्रोग्रामची सद्यस्थिती दर्शविण्यासाठी जी जागा दिलेली असते तिला स्टेटस् बार असे म्हणतात. सर्वसाधारण पणे वर्क एरियाच्या खालोखाल हा बार दर्शविण्यात आलेला असतो.
९. टास्कबार -
टास्क म्हणजे काम. संगणकमध्ये आपण जेवढे प्रोग्राम उघडलेले असतात, ते सर्व प्रोग्राम दर्शविण्याचे काम टास्कबार करत असतो. संगणक एकाच वेळी अनेक कामे सहज करु शकतो, संगणकाच्या या वैशिष्टयाला " मल्टिटास्किंग" असे म्हटले जाते.
तसेच टास्कबारवर स्टार्ट बटण, सर्च बॉक्स, कोर्टाना, तसेच पिन केलेले प्रोग्राम्स शिवाय संगणकाच्या सेटिंग्ज आणि आजची तारीख व वेळ दर्शविली जाते.


No comments:
Post a Comment