Mr. Sadashiv Kisanrao Dhakne

Monday, March 24, 2025

प्रकरण क्र. ३ रे - Desktop (GUI Interface)

 प्रकरण क्र. ३ रे -  Desktop (GUI Interface)

What is GUI? जी यु आय म्हणजे काय?

GUI म्हणजे Graphical User Interface अर्थात "चित्रदर्शी वापर सुविधा". याचा उपयोग संगणक सुरु झाल्यानंतर युजरला विविध चित्रांच्या साह्याने सुविधा पुरविणे हा आहे. १९९८ पुर्वीचे संगणक हे कुठलेही काम करण्यासाठी "कमांड" वापरायचे. संगणक सुरु झाल्यानंतर समोर कमांड लॅग्वेज ओपन होत असे, एखादा प्रोग्राम ओपन करायचा असल्यास त्या प्रोग्रामची कमांड युजरला माहीत असणे अनिवार्य होते. परंतु कालांतराने GUI Base असणाऱ्या ऑपरेटींग सिस्टीममुळे युजरचे काम अधिक सोपे झाले. युजरला सर्व प्रोग्राम, फाईल, फोल्डर तसेच विविध सेटींग्ज ह्या चित्राच्या स्वरुपात दिसू लागल्या. प्रोग्राम ओपन केल्यावर तो एका चौकटीत व्यवस्थितरित्या  दर्शविला जाऊ लागला, याच चौकटीला संगणकीय परिभाषेत " विंडो" असे म्हणतात. तसेच संगणक सुरु झाल्यानंतर जो पडदा समोर दर्शविला जातो, त्यास "डेस्कटॉप" असे म्हणतात.

डेस्कटॉप म्हणजे काय? 

व्याख्या - संगणक सुरु झाल्यानंतर मॉनिटर स्क्रीनवर सर्वप्रथम जे चित्रमय (Graphical) दृश्य दर्शविले जाते, त्यास डेस्कटॉप असे म्हणतात.

सर्वसाधारण पणे कुठलाही प्रोग्राम सुरु नसेल तर मॉनिटरवर सतत डेस्कटॉपच दिसत राहतो. डेस्कटॉप हे जीयुआय (GUI - Graphical User Interface) चे एक वैशिष्टये आहे. जीयुआय हे अत्याधुनिक ऑपरेटींग सिस्टीमचे एक अतिशय महत्त्वाचे वैशिष्टये आहे. ज्यात युजर संगणक सुरु झाल्यानंतर चित्रांच्या आधारे संगणक ऑपरेट करु शकतो. पूर्वी संगणकामध्ये कुठलेही काम करायचे असल्यास त्यासाठी "कमांड" टाईप करुन मगच प्रोग्राम चालू करता येत असे. त्यामुळे संगणकाचे किमान ज्ञान असल्याशिवाय युजर संगणकावर काम करु शकत नव्हता. परंतु जीयूआय मुळे युजरला सर्वप्रथम डेस्कटॉप दिसतो व डेस्कटापवर असणाऱ्या विविध आयकॉन्स मुळे व टास्कबार मुळे युजरला संगणकावर काम करणे सहज शक्य होते.

डेस्कटॉपवर सर्वसाधारणपणे खालील बाबींचा समावेश असतो.

१.       आयकॉन्स (Icons) – आयकॉन्स म्हणजे एक छोटे चित्र जे एखाद्या प्रोग्राम, फोल्डर किंवा एखाद्या फाईलचे असू शकते. ते शॉर्टकटचा उपयोग करते. प्रोग्राम्सच्या चित्रावर डबल क्लिक करुन आपण सरळ त्या प्रोग्रामला Open करु शकतो.

a.     प्रोग्रामचे आयकॉन्स– संगणकामध्ये आपण र्जेव्हा एखादा प्रोग्राम Install करतो तेव्हा त्या प्रोग्रामचे एक छोटे चित्र डेस्कटॉपवर येत असते ज्याचा वापर करुन आपण तो प्रोग्राम Open करु शकतो.  उदा., खाली दर्शविण्यात आलेले गुगल क्रोम ब्राऊझरचा आयकॉन. काही वेळेस प्रोग्राम Install केले तरी त्याचे आयकॉन्स डेस्कटॉपवर आपोआप येत नाही. युजरला त्या प्रोग्रामची गरज असल्यास युजर आपल्या सोयीनुसार डेस्कटॉपवरील आयकॉन कमी किंवा जास्त करु शकतो. त्यामुळे डेस्कटॉपवरील आयकॉन्सची संख्या ही निश्चित नसते.

b.    फाईलचे आयकॉन्स -  युजरने संगणकामध्ये केलेल्या कामाला एखाद्या नावाने सेव्ह केले जाते. त्या कामाच्या संचाला फाईल असे म्हणतात. अशा तयार केलेल्या फाईलचा शॉर्टकट रुपी आयकॉन युजरला संगणकाच्या डेस्कटॉपवर घ्यायचा असेल तर अशा फाईलवर माऊसचे उजवे बटण दाबून Send to – Desktop create shortcut हा पर्याय वापरुन घेता येते. उदा. खाली दर्शविण्यात आलेला फाईलचा आयकॉन्स.

c.      फोल्डरचे आयकॉन्स - युजर संगणकामध्ये ज्या विविध फाईल्स तयार करत असतो, त्या फाईल सेव्ह करण्यासाठी युजर फोल्डर चा उपयोग करत असतो. फोल्डर कपाटातील एखाद्या कप्प्यासारखा काम करतो. ज्यात फाईलच्या वर्गवारीनुसार फोल्डर तयार केले जातात. असे फोल्डर जलद उघडण्यासाठी फोल्डरचा एक शॉर्टकट डेस्कटॉपवर घेता येतो. त्यासाठी फोल्डरवर माऊसचे उजवे बटण दाबून Send to – Desktop create shortcut हा पर्याय वापरुन घेता येतो.

आयकॉन्सची संख्या - 

        युजरने संगणकामध्ये प्रस्थापित (Install) केलेल्या प्रोग्रामनुसार व गरजेनुसार डेस्कटॉपवर घेतलेल्या फाईल व फोल्डरच्या शॉर्टकट नुसार डेस्कटॉपवरील आयकॉन्सची संख्या ठरत असते. म्हणजेच आयकॉन्सची संख्या ही निश्चित नसते. ती युजरच्या गरजेनुसार सतत कमी जास्त होत असते. तरी विंडोज ऑपरेटींग सिस्टीम प्रस्थापित (Install)केल्यानंतर काही ठराविक आयकॉन्स हे आपोआप डेस्कटॉपवर दाखविले जातात. त्यामध्ये खालील आयकॉन्सचा समावेश होतो.

a. This PC - या आयकॉन्सचा वापर करुन संगणकामधील हार्ड डिस्कवरील सर्व स्टोरेज साधने दर्शविली जातात. त्यामध्ये Local Disk (C): व इतर डीस्क दर्शविल्या जातात. त्यामुळे संगणकाच्या हार्डडिस्कवरील कुठल्याही भागावर सहज प्रवेश मिळविता येतो. तसेच पीसी ला जोडलेले इतर स्टोरेज डिव्हाईस जसे पेन ड्राईव्ह, सीडी ड्राईव्ह हे देखील याद्वारे उघडून पाहता येतात.

b. User Icon : या आयकॉन्सच्या मदतीने युजरने तयार केलेल्या डॉक्युमेंट, पिक्चर, संगित, व्हीडीओ इ. लायब्ररीज उघडून पाहता येतात.

c. Recycle Bin : रिसायकल बीन ही संगणकाची कचरा पेटी असते. म्हणजेच युजरने डिलीट केलेल्या फाईल्स या Recycle Bin मध्ये टाकल्या जातात. अर्थात त्या तिथून परत Restore (पुन्हा साठवणे) घेता येतात म्हणजेच रिसायकल करता येतात.  परंतु Shift + Delete बटणाचा वापर करुन कायम डिलीट केलेल्या फाईल या रिसायकल बीन मध्ये जातच नाही, त्यामुळे त्या रिसायकल करता येत नाही.

आयकॉन्सचा आकार - 

        युजरला आयकॉन्सचा आकार कमी जास्त करता येतो, त्यासाठी Ctrl चे बटण दाबून धरुन माऊसचे मधले स्क्रोल बटण फिरविल्यास आयकॉन्सचा आकार कमी जास्त करता येतो.  शिवाय डेस्कटॉपवर माऊसचे उजवे बटण दाबून येणाऱ्या यादीमधून View - Large Icon, Medium Icon आणि Small Icon अशी सेटींग देखील करता येते.

आयकॉन्स लपविणे व दर्शविणे - 

        युजरने तयार केलेले आयकॉन्स डेस्कटॉपवरुन Hide करायचे असल्यास  डेस्कटॉपवर माऊसचे उजवे बटण दाबून येणाऱ्या यादीमधून View - View Desktop Icon च्या समोरील खुण काढून टाका. सर्व आयकॉन्स Hide झालेले दिसतील. पुन्हा परत आणायचे असल्यास पुन्हा डेस्कटॉपवर माऊसचे उजवे बटण दाबून येणाऱ्या यादीमधून View - View Desktop Icon च्या समोरील खुण दर्शवा. आयकॉन्स डेस्कटॉपवर आलेले दिसतील.

२. वालपेपर (Wallpaper) संगणकाचा पडदा आकर्षक दिसावा याकरीता डेस्कटॉपच्या बॅकग्राऊंडवर एक चित्र सेट केलेले असते, त्यास वालपेपर असे म्हणतात. युजरला संगणकातील तसेच ऑनलाईन असलेले कुठलेही चित्र डाऊनलोड करुन वालपेपर म्हणून सेट करता येते. संगणकातील जे चित्र तुम्हाला वालपेपर म्हणून सेट करावयाचे असेल त्यावर माऊसचे उजवे बटण दाबा, येणाऱ्या यादीतून Set as desktop background हा पर्याय निवडा. तुम्ही निवडलेले चित्र वालपेपर म्हणून सेट झालेले असेल.

३. टास्कबार (Taskbar) - टास्क म्हणजे काम व बार म्हणजे ठिकाण अर्थात संगणकामध्ये किती कामे चालू आहेत हे दर्शविणारे ठिकाण म्हणजे टास्कबार होय. संगणकावर डेस्कटॉपच्या सर्वात खाली एक आडवा बार दिलेला असतो, ज्यावर स्टार्ट बटणांबरोबरच विविध घटक दिलेले असतात, त्यास टास्कबार असे म्हणतात. युजर जेवढे प्रोग्राम ओपन करतो त्या सर्व प्रोग्रामचे मिनिएचर म्हणजे छोटे चित्र टास्कबारवर दर्शविले जाते, त्यामुळे एकाच वेळी किती प्रोग्राम चालू आहेत याचा अंदाज येतो. शिवाय टास्कबारवर खालील काही बाबी दर्शविलेल्या असतात.

a. Start Button : संगणकामध्ये कुठलाही प्रोग्राम सुरु करायचा असल्यास, संगणकाच्या सेटींग्ज बदलायच्या असल्यास तसेच संगणक बंद करायचा असल्यास याच बटणाचा उपयोग केला जातो.

b. Search Bar: स्टार्ट बटणाच्या बाजूला सर्च बॉक्स दिलेला असतो, ज्यामध्ये आपण कुठल्याही प्रोग्राम किंवा फाईलचे नाव टाकून संगणकातील तो प्रोग्राम किंवा फाईल शोधून काढू शकतो. 

c. Pin Program : युजरला हवे असलेले वारंवार वापरात असलेले प्रोग्राम टास्कबारवर पीन करता येतात. त्यामुळे एखाद्या प्रोग्राममध्ये सहज प्रवेश मिळविता येतो. असे पीन केलेले प्रोग्राम नका असल्यास ते unpin देखील करता येतात.

d. Network Connectivity : संगणक नेटवर्कला कनेक्ट आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी टास्कबार वर उजव्या बाजूला नेटवर्क चे चित्र दर्शविले जाते, त्यावरुन संगणक नेटवर्कला कनेक्ट आहे किंवा नाही हे लक्षात येते.

e. Sound Button : संगणकाचा ध्वनी नियंत्रित ठेवण्यासाठी टास्कबारवर उजव्या कोपऱ्यात स्पीकरचे चित्र दर्शविले जाते, त्यावर क्लिक करुन संगणकाचा आवाज नियंत्रित केला जातो.

f. Date and Time : संगणकाच्या टास्कबारवर उजव्या कोपऱ्यात आजचे दिनांक व सध्याची वेळ दर्शविली जाते.

g. Notification Icon : संगणकाच्या वेळच्या समोर एक नोटीफिकेशन आयकॉन दिसतो. त्यावर सतत संगणकाच्या विविध सेंटींग व मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या आलेल्या नोटीफिकेशन्स दर्शविल्या जातात. ज्याच्या साह्याने युजर ऑपरेटींग सिस्टीमशी संवाद साधू शकतो.


वरीलप्रमाणे विविध घटकांनी युक्त असा डेस्कटॉप यूजरला विविध प्रकारची सेवा देत असतो. ज्यामुळे युजरला संगणकावर काम करणे अधिक सोयीचे होते.

============xxxxxxx==============

 

No comments:

Post a Comment