Mr. Sadashiv Kisanrao Dhakne

Thursday, March 27, 2025

प्रकरण क्र. ५ पेंट प्रोग्राम

  प्रकरण क्र. ५  पेंट  प्रोग्राम

सर्वसाधारणपणे चित्र काढणे आणि त्यास रंगविणे यासाठी पेंट प्रोग्रामचा उपयोग केला जातो.  पेंट प्रोग्रामच्या फाईलला ‘‘ बिटमॅप इमेज’’ असे म्हणतात. विंडोज 7 या आॅपरेटिंग सिस्टिम मध्ये पेंट फाईल .bmp या एक्स्टेंषनने सेव्ह केली जाते.  तयार केलेली फाईल .jpg/jpeg/png/gif या फाॅरमॅट मध्येही सेव्ह करता येते. फाईल म्हणजे प्रोग्राममध्ये केलेले काम होय.  असे केलेले काम आपण एखादे नाव देवून सेव्ह करत असतो.  फाईलचे नाव दोन भागांत विभागलेले असते. एक म्हणजे फाईलचे नाव आणि दुसरे म्हणजे एक्स्टेंषन हे होय.  समजा, Newmaitree.jpg हया फाईलमध्ये Newmaitree हे फाईलचे नाव आहे तर .jpg हे त्या प्रोग्रामचे एक्स्टेंष्न म्हणजेच प्रोग्रामची ओळख असते.  प्रत्येक प्रोग्रामसाठी एक्स्टेंषन हे वेगवेगळे असते.  ज्यामुळे फाईल कुठल्या प्रोग्रामची आहे.  हे ओळखण्यास मदत होते.

    पेंट प्रोग्राम ओपन केल्यानंतर आपल्यासमोर डेस्कटाॅप जावून विंडो ओपन होत असते.  जीला आपण पेंट प्रोग्रामची विंडो असे म्हणतो.  प्रोग्राम कुठलाही असो तो विंडोमध्येच ओपन केला जात असतो. Window चा शब्दषः अर्थ खिडकी असा होतो.  प्रोग्राम ओपन केल्यानंतर तो साधारणतः खिडकीसारखा दिसतो म्हणून त्यास Window असे म्हणतात.

Part of Window -

1. टायटल बार:- प्रोग्राम कोणताही असो प्रत्येक प्रोग्रामसाठी एक टायटल बार असतोच.  टायटल बार वर प्रोग्रामचे नाव तसेच फाईलचे नाव  दाखवले जाते.  Paint हे प्रोग्रामचे नाव आहे तर Untitled हे चालू असलेल्या फाईलचे नाव असते.  याषिवाय टायटल बारवर पुढिल तीन बटणे असतात.

अ.  मिनीमाईज:- हया बटणाचा उपयोग प्रोग्राम तात्पुरता बंद करण्यासाठी होत असतो.  तात्पुरता बंद केलेला प्रोग्राम टास्कबारवर पहावयास मिळतो.  टास्कबारवर प्रोग्रामचे जे नाव दिलेले असते त्या नावावर क्लिक करुन प्रोग्राम पुन्हा ओपन करता येतो.

ब.  रिस्टोअर डाऊन:-  ओपन असलेल्या प्रोग्रामची विंडो छोटी करावयाची असल्यास रिस्टोअर डाऊन या बटणाचा उपयोग होतो.  एकाच वेळी दोन किवा दोनपेक्षा जास्त प्रोग्राम ओपन करावयाचे असल्यास विंडो रिस्टोअर डाऊन केली जाते.  

रिस्टोअर डाऊन केलेली विंडो पुन्हा मोठी करावयाची असल्यास रिस्टोअर डाऊन या बटणाच्या जागी येणारे मॅक्झीमाईज या बटणाचा उपयोग करावा लागतो.

क. क्लोज:- या बटणाचा उपयोग प्रोग्राम पूर्णपणे बंद करण्यासाठी होत असतो.  

2. मेनू बार:- प्रत्येक प्रोग्रामसाठी मेनू बार असतो.  प्रोग्राममध्ये काम करण्यासाठी आवष्यक असलेल्या सुचनांच्या यादीला मेनूबार असे म्हणतात.  पेंट प्रोग्राममध्ये सर्वसाधारणतः फाईल, इडिट, व्हयु, इमेज, कलर आणि हेल्प इत्यादी मेनू दिलेले असतात.  कुठल्याही मेनूवर क्लिक केल्यानंतर त्यातून एक यादी उघडली जाते, अषा यादीला पूल डाऊन मेनू किंवा ड्राॅप डाऊन मेनू असे म्हणतात.  या पूल डाऊन मेनू मध्ये विविध कमांड्स म्हणजेच आज्ञा दिलेल्या असतात.  पेंट प्रोग्राममधील विविध मेनू आणि त्यातील विविध कमांड्सची माहिती पुढिलप्रमाणे ......

1. File   फाईल:-  फाइलषी संबंधीत विविध बाबींवर प्रकिया करण्यासाठी.

    1. New:- नविन फाईल घेण्यासाठी या बटणाचा उपयोग होतो.

    2. Open :- जुनी अगोदर सेव्ह केलेली फाईल ओपन करण्यासाठी याचा उपयोग होतो.

    3. Save :- तयार केलेले फाईलमधील काम सेव्ह करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये फाइल सेव्ह करतांना एकाच नावाच्या दोन फाईल सेव्ह करता येत नाही याची काळजी घेणे आवष्यक आहे.  एकाच नावाच्या दोन फाईल सेव्ह करण्याचा प्रयत्न केल्यास अगोदर सेव्ह केलेली फाईल ही काढून टाकली जाते.  सेव्ह करतांना फाईलचे नाव, फाईल कोठै सेव्ह करायची आहे ते लोकेषन तसेच फाईल टाईप म्हणजेच कोणत्या प्रकारची फाईल सेव्ह करावयाची आहे हे निष्चित करावे लागेल.

    4. Save As  :- सेव्ह केलेल्या एखादया फाईलची हूबेहूब नकल करुन डूप्लीकेट फाईल तयार करण्यासाठी व त्या तयार केलेल्या फाईलला नविन नाव देण्यासाठी सेव्ह अॅज या बटणाचा उपयोग केला जातो.

    5. Print Preview :  एखाद्या फाईल्सची प्रिंट कषी निघेल ते प्रींट करण्यापूर्वी पाहण्यासाठी या बटणाचा उपयोग केला जातो.

    6. Page Set Up : पानाची विविध सेटिंग करण्यासाठी या बटणाचा उपयोग केला जातो.  जसे, पानाचा प्रकार, आकार, मार्जिन, ओरिएंटेषन म्हणजे मजकूर लिहीतांना पान उभे ठेवायचे की आडवे ठेवायचे ते निष्चित करता येते.

    7. Print फाईलची प्रिंट काढण्यासाठी या बटणाचा उपयोग केला जातो.  प्रिंट काढतांना सर्व पानाची तसेच तूम्ही निवडलेल्या भागाचीही प्रिंट काढता येते.  तसेच किती प्रती काढायच्या तेही निष्चित करता येते.

    8. Send To Email :  तयार केलेली फाईल तुमच्या मित्रांना ई-मेल करायची असल्यास ती पाठविण्यासाठी या बटणाचा उपयोग होतो.

    9. Exit :  प्रोग्राम पूर्णपणे बंद करण्यासाठी इक्झीट या बटणाचा उपयोग केला जातो.  टायटल बारवरील क्लोज बटणाचा उपयोग करुन जी कृती केली जाते. तीच कृती इक्झीट बटणाचा उपयोग करुन केली जाते.

2.   Home Menu : फाईलमध्ये काही बाबींवर मुलभूत बदल करण्यासंबंधी या मेनूचा वापर केला जातो. या मेनुवर क्लिक केल्यानंतर रिबनवर आपणास विविध ग्रुप्स उपलब्ध होतात. त्यामध्ये प्रामुख्याने 1. क्लिपबोर्ड ग्रुप्स 2. इमेज ग्रुप 3. टूल्स ग्रुप्स 4. शेप्स ग्रुप्स आणि 5.  कलर्स गु्रप्स या सर्व ग्रुप्सची थोडक्यात माहिती बघू.

    1. क्लिप बोर्ड्र ग्रुप्स:( Clipboard Groups) -

        a. Cut : तुम्ही निवडलेला भाग काॅपी करुन काढून टाकण्यासाठी या बटणाचा उपयोग केला जातो.

        b. Copy :  चित्रातील एखादा भाग जसाच्या तसा पुन्हा घ्यायचा असल्यास संबंधित भाग सलेक्ट करुन त्याची काॅपी करण्यासाठी या बटणाचा उपयोग होतो.

      C.  Paste : काॅपी केलेला भाग एखादया ठिकाणी ठेवण्यासाठी किंवा चिटकविण्यासाठी या बटणाचा उपयोग होतो.

    2. Image Tab :  चित्रावर विविध प्रक्रिया करण्यासाठी या मेनूचा उपयोग केला जातो.

       A. Select :  चित्रातील एखादा भाग सलेक्ट करण्यासाठी या बटणाचा उपयोग करु शकतो.  संपूर्ण फाईल सलेक्ट केल्यानंतर तिला हलविताही येते, तिची काॅपीही केली जाते तसेच तिला डिलीटही करता येते. सलेक्ट करण्यासाठी या बटणाच्या बाजुला असलेलेल्या बाणावर क्लिक करून दोन प्रकारे सलेक्षन करता येते.

        a. Rectangular Selection :  ज्यामध्ये विषिष्ट चैकोनी भागात येणारा चित्राचा भाग सलेक्ट केला जातो. 

        b. Free from Selection :  यामध्ये व्यक्तीला चित्रातील कोणताही भाग सलेक्ट करता येतो तसेच विविध आकारामध्येही सलेक्षन करता येते. हवा तेवढाच भाग सलेक्ट करण्यासाठी हा पर्याय वापरला जातो.

  B.  Size :  तयार केलेल्या चित्राचा आकार पिक्सेल रेट नुसार कमी अथवा जास्त करण्यासाठी हा पर्याय वापरला जातो.

  C.Rotate : चित्रातील काही भाग अथवा पूर्ण चित्र उलट सुलट करण्यासाठी हा पर्याय वापरला जातो. पुढीलप्रमाणे चित्र उलट सुलट करता येते.

    a. Flip/Rotate : चित्रावर विविध उलट सुलट बदल करण्यासाठी या बटणाचा उपयोग केला जातो.

    b. Flip Horizontal :  चित्राला आडव्या पध्दतीने आरषातील प्रतिमेप्रमाणे उलट करण्यासाठी या बटणाचा उपयोग होतो.

    c. Flip Vertical : चित्राला व्यस्त प्रमाणात उलट करण्यासाठी म्हणजेच खाली डोके वर पाय या पध्दतीने उलटे करण्यासाठी या बटणाचा उपयोग होतो.

    d. Rotate by Angle :  सलेक्ट केलेल्या चित्राला विषिष्ट कोनामध्ये फिरविण्यासाठी या बटणाचा उपयोग होतो.  यामध्ये 90,180,270 अषा विविध कोनामध्ये चित्राला फिरविता येते.

3.Tools Groups :  पेंट प्रोग्राम मध्ये चित्र काढण्यासाठी विविध साहीत्याची आवष्यकता असते. असे विविध साहीत्य टूल्स ग्रुप्स पुरवित असतो. तसेच काढलेले चित्र रंगविण्यासाठी विविध प्रकारचे ब्रषची आवष्यकता असते. असे विविध ब्रष टूल्स ग्रुप्स मध्ये असतात. 

4. Shape Groups :  पेंट प्रोग्रामध्ये विविध आकाराचे चित्रे काढतांना युजरला मदत व्हावी या उद्देषाने काही आकार शेप्स या ग्रुपमध्ये दिलेले असतात. याचा वापर करून युजरचा वेळ तर वाचतोच परंतु यामुळे येणारा आकारही नीट काढता येतो.

5. Color Box :   च्ंपदज प्रोग्राममध्ये चित्र रंगविण्यासाठी विविध रंग कलर बाॅक्समध्ये दिलेले असतात.  परंतु जे रंग कलर बाॅक्समध्ये दिलेले नसतात. असे रंग घेण्यासाठी कलर या मेनूमधील इडिट कलर या पर्यायाचा उपयोग करुन नविन रंग मिळविता येतात.

3. View Menu :  विंडामध्ये काही बाबी पाहण्यासंबंधी किंवा काढून टाकण्यासंबंधी या मेनूचा वापर केला जातो.


No comments:

Post a Comment