Mr. Sadashiv Kisanrao Dhakne

Saturday, March 22, 2025

प्रकरण क्र. २.Booting Process बुटिंग प्रोसेस आणि युजर अकाऊंट

  प्रकरण क्र. २.Booting Process बुटिंग प्रोसेस आणि युजर अकाऊंट

Booting Process बुटिंग प्रोसेस -

व्याख्या - संगणक सुरु किंवा पुन: सुरु करण्याची प्रक्रीया म्हणजे बुटिंग प्रोसेस होय.

बुटिंग प्रोसेसचे दोन प्रकार पडतात.

१. कोल्ड बुट (Cold Boot)

२. वार्म बुट (Warm Boot)

१. कोल्ड बुट - 

संगणक पुर्णत: बंद असतांना आपण जेव्हा त्यास सुरु करतो त्या प्रक्रीयेला "कोल्ड बुट" असे म्हणतात.

२. वार्म बुट - 

संगणक सुरु असतांना काही तांत्रिक कारणामुळे किंवा युजरने दिलेल्या सुचनांच्या विसंगतीमुळे संगणक पुन्हा सुरु करावा लागतो, याला वार्म बुट असे म्हणतात. यालाच रिस्टार्ट असेही म्हटले जाते.


युजर अकाऊंट - 

एकाच संगणकामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींना आपले खाते तयार करता येतात. या खात्याला युजर अकाऊंट असे म्हणतात. युजर अकाऊंट तयार केल्या नंतर प्रत्येक युजरला संगणकात आपापल्या पासवर्डने प्रवेश मिळतो तसेच आपापल्या वैयक्तिक सेंटींग्स निश्चित करता येतात.

युजर अकाऊंट चे प्रकार -

युजर अकाऊंट हे दोन प्रकारचे असतात. 

१. स्टॅडर्ड युजर अकाऊंट - या प्रकारच्या अकाऊंटमध्ये युजरला संगणकामध्ये केवळ गेस्ट म्हणून प्रवेश मिळतो. या यूजरला संगणकामध्ये महत्त्वाच्या सेटिंग्ज करण्याचे अधिकार नसतात.

२. ॲडमिनिस्टेटर युजर अकाऊंट - या प्रकारच्या अकाऊंटमध्ये युजरला संगणकातील सर्व प्रकारच्या सेटिंग करण्याचे अधिकार प्राप्त झालेले असतात.

युजर अकाऊंटशी संबधित काही संकल्पना -

१. Log In/ Sign In : एखाद्या युजर अकाऊंटमध्ये प्रवेश करण्याला लॉग इन किंवा साईन इन असे म्हणतात. लॉग इन करण्यासाठी युजरकडे पासवर्ड असणे आवश्यक आहे.

२. Log Out/ Sign Out : एखाद्या युजर अकाऊंटमधून बाहेर पडण्याला लॉग आऊट किंवा साईन आऊट असे म्हणतात.

३. Switch User :  संगणकामध्ये असणाऱ्या विविध युजर अकाऊंटमध्ये प्रवेश घेतलेला असतांना दुसऱ्या अकाऊंटमध्ये जाण्यासाठी स्विच युजर हा पर्याय वापरला जातो.

४. Lock :  या पर्यायाचा वापर युजर आपल्या अकाऊंटमध्ये इतरांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी करत असतो. युजर लॉक केल्यानंतर पासवर्ड शिवाय इतर कुणालाही अकाऊंटमध्ये प्रवेश घेता येत नाही.

५. Sleep :  संगणकावर काही काळ काम नसल्यास व विज बचत करण्याची आवश्यकता असल्यास स्लीप हा पर्याय वापरला जातो. म्हणूनच याला पावर सेव्हींग मोड असेही म्हणतात.

६. Restart : संगणकामध्ये काम करतांना कार्यात्मक गुंता निर्माण झाला असल्यासस संगणक रिस्टार्ट करावा लागतो. त्यानंतर पुन्हा संगणक सुरु केले जाते व उर्वरित काम पूर्ण केले जाते. या प्रकाराला वार्म बुट असे देखील संबोधले जाते.

७. Shut Down/ Turn off :  संगणक पुर्णत: बंद करण्यासाठी शट डाऊन हा पर्याय वापरला जातो. संगणक शट डाऊन करतांना चालू असलेले काम व डेटा सेव्ह केले आहे ना. याची खात्री करा व नंतरच संगणक बंद करा.

मित्रांनो, आज आपण संगणक सुरु करण्याची व युजर अकाऊंट तयार करण्याची, तसेच अकाऊंटशी संबंधित विविध संकल्पना समजून घेतल्या आहेत. आपण याचा चांगल्या पध्दतीने सराव करावा. उद्या आपण संगणक बुट झाल्यानंतर समोर येणाऱ्या स्क्रीन विषयी अर्थात डेस्कटॉप विषयी माहीत बघणार आहोत.

धन्यवाद.

No comments:

Post a Comment