प्रकरण क्र. ६. माऊस - एक पॉईंटिंग डिव्हाईस - परिचय आणि कार्य
माऊस म्हणजे काय?
शब्दश: अर्थ काढायचा म्हटलं तर माऊस म्हणजे उंदीर असा होतो. पण संगणकाचा माऊस हा वेगळा आहे. उंदराच्या आकाराचा स्क्रीनवरील पॉईंटर (ॲरो) वर नियंत्रण ठेवणारा एक पॉईंटींग डिव्हाईस म्हणजे माऊस होय. माऊस हा सर्वात जास्त वापरला जाणारा पॉईंटींग डिव्हाईस आहे. माऊस एक, दोन किंवा तीन बटणांचा देखील असू शकतो.
माऊस चे प्रकार - (Type of Mouse)
१. मेकॅनिकल माऊस - या माऊसच्या तळाशी गोल फिरणारा चेंडू असतो. मॅग्नेटीक तंत्रज्ञानावर आधारीत असलेला हा माऊस पृष्ठभागावार जशी चेंडू फिरेल त्या पध्दतीने पॉईंटरवर नियंत्रण ठेवत असतो. परंतु ऑप्टिकल तंत्रज्ञानाचा विकास झाल्यानंतर या माऊसचा उपयोग खुप कमी प्रमाणात करण्यात येत आहे.
२. ऑप्टिकल माऊस - या माऊसच्या तळाशी चेंडुच्या ठिकाणी एक लाईट असतो, हा माऊस आप्टिक तंत्रज्ञानावर आधारीत असून प्रकाशकिरणांच्या साह्याने पॉईंटरवर नियंत्रण ठेवले जाते. सध्या ह्याच माऊसचा उपयोग मोठया प्रमाणावर केला जातो.
३. वायरलेस माऊस - या माऊसला वायर नसते. बॅटरीच्या साह्याने काम करणारा हा माऊस वायफाय तंत्रज्ञानाच्या साह्याने स्क्रीनवरील पॉईंटरवर नियंत्रण ठेवतो.
माऊसचे उपयोग/ कामे -Uses of Mouse
1. Clicking ( क्लिक करणे) - माऊसचे बटण एकदा दाबून सोडणे याला "क्लिक करणे" असे म्हणतात. क्लिकींगचे दोन प्रकार पडतात ते खालीलप्रमाणे -
A. Left Clicking (डावे बटण क्लिक करणे) - माऊसचे डावे बटण एकदा दाबून सोडणे याला "क्लिक करणे" असे म्हणतात. डावे बटण तीन प्रकारे वापरले जाते. ते खालीलप्रमाणे
a. Single Clickng - (Go to Location) -एखादा घटक निवडण्यासाठी, तसेच डॉक्युमेंटमध्ये एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी माऊसचे डावे बटण क्लिक केले जाते.
b. Double Clicking - (Open Programe/File/Folder) - निवडलेला प्रोग्राम, फाईल किंवा फोल्डर ओपन करण्यासाठी माऊसचे डावे बटण डबल क्लिक केले जाते. शिवाय डॉक्युमेंटमध्ये एखादा शब्द पूर्ण सलेक्ट करण्यासाठी डबल क्लिक केले जाते.
c. Tripple Clicking - (Paragraph Selection) माऊसचे डावे बटण शक्य तेवढ्या पटपट तीनवेळा दाबणे याला ट्रीपल क्लिक असे म्हणतात. डॉक्युमेंटमध्ये एखाद्या ओळीवर किंवा परिच्छेदावर ट्रीपल क्लिक केल्यास संपूर्ण वाक्य किंवा परिच्छेद एकाच वेळी सलेक्ट करता येतो.
B. Right Clicking (उजवे बटण क्लिक करणे)- (open shortcut command)- माऊसचे उजवे बटण दाबून सोडणे याला राईट क्लिक असे म्हणतात. राईट क्लिक करुन सलेक्ट केलेल्या घटकावर करण्यात येणाऱ्या विविध शॉर्टकट क्रियांची यादी दर्शविली जाते.
2. Scrolling - स्क्रोलींग करणे
डॉक्युमेंट किंवा कुठल्याही प्रकारची फाईल असेल तर त्या फाईला नेव्हीगेटींग करण्यासाठी स्क्रोल करावे लागते. हे काम माऊसचे स्क्रोल बटण करत असते. यासाठी विंडोमध्ये दोन स्क्रोल बार देखील दिलेले असतात. १. व्हर्टिकल स्क्रोल बार आणि २ होरिझोंटल स्क्रोल बार.
3. Navigating / Pointing (मजकूरामध्ये फिरणे किंवा पॉईंटरच्या साह्याने घटक दर्शविणे) - बऱ्याचदा मजकुरामध्ये विविध ठिकाणी क्लिक करुन कर्सर किंवा इन्सर्शन पॉईंट निश्चित करण्यासाठी तसेच विंडोमधील विविध घटक पॉईंटरच्या साह्याने दर्शविण्यासाठी माऊसचा उपयोग केला जातो. यालाच नेव्हीगेटींग किंवा पॉईंटींग असे म्हणतात.
4. Dragging - (Move the object)- एखाद्या घटकावर माऊसचे डावे बटण दाबून धरुन इतर ठिकाणी ओढण्याला ड्रॅगिंग असे म्हणतात. जेव्हा एखादा घटक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचा असेल तेव्हा ही क्रिया केली जाते.
5. Dropping -(Fix the object) - ड्रॅगिंगच्या साह्याने एका ठिकाणाहून एखादा घटक ओढून आणल्यानंतर तो ज्या ठिकाणी ठेवायचा आहे, तेथे माऊसचे बटण सोडून देणे याला ड्रॉपिंग असे म्हणतात. यामुळे ड्रॅग केलेला घटक विशिष्ट ठिकाणी निश्चित केला जातो.
वरीलप्रमाणे माऊस विविध प्रकारचे काम करत असतो. संगणकामध्ये युजर माऊसच्याच साह्याने विविध आदेश किंवा सुचना देत असतो. माऊसच्या ऐवजी लॅपटॉप असेल तर टचपॅड वापरला जातो. हेच काम करण्यासाठी युजर जॉयस्टीक, स्टायलस, टचस्क्रिन, पॉईंटिंग स्टीक, ट्रॅकबॉल, फुट माऊस, पॉइंटिंग स्टीक इ. उपकरणांचाही वापर करु शकतो.

No comments:
Post a Comment