Mr. Sadashiv Kisanrao Dhakne

Thursday, May 22, 2025

Ms-Excel 2019 (एम एस एक्सेल 2019)

 Ms-Excel 2019 (एम एस एक्सेल 2019)

MS-EXCEL 2019 म्हणजे काय?

     Microsoft Office 2019 सॉफ्टवेअर सुट मधील अंकगणितीय क्रिया करणारे एक सर्वोत्तम टूल म्हणजे Microsoft-Excel 2019 होय.

MS-EXCEL हा प्रोग्राम Workbook (Spreadsheet) फाईल बनवितो. या फाईलचे एक्सटेंशन .xlsx असे आहे. म्हणजेच Maitree.xlsx असे फाईलचे नाव दिसेल. जेव्हा आपण MS-Excel प्रोग्राममध्ये Template फाईल तयार करतो अशावेळी हे एक्सटेंशन .xltx असे असते.

Workbook (Spreadsheet) फाईल म्हणजे काय?

 Workbook फाईललाच Spreadsheet फाईल असेही म्हणतात. Workbook ही विविध वर्कशीटची (worksheet) मिळून बनलेली असते. एका वर्कबुकमध्ये २५५ वर्कशीट (worksheet) युजरला घेता येतात.

वर्कशीट (worksheet) :  एक वर्कशीट ही कॉलम आणि रो (Colomn & Rows) ची मिळून बनलेली असते. 

कॉलम (Column) - स्तंभ : वर्कशीटमध्ये A,B,C,D...... अशी नावे असलेली 16384 कॉलम असतात. पहील्या कॉलमचे नाव A तर शेवटच्या कॉलमचे नाव हे XFD असे असते. एक कॉलम युजरला एका गटातील किंवा गुणवैशिष्टये असलेली माहीती दर्शवित असते.

रो (Row)- ओळी : एका वर्कशीटमध्ये 1,2,3,4.....असे क्रमांक असलेल्या 1048576 ओळी (Rows) असतात.

सेल (cell) : एखादा कॉलम एखाद्या सेलला ज्या ठिकाणी छेद देतो, त्या ठिकाणी एक चौकट /बॉक्स तयार होतो, त्यास सेल (Cell) असे म्हणतात. प्रत्येक सेलला स्वत:चे स्वतंत्र असे नाव असते. आणि हे नाव कॉलमचे नाव व ओळीचा क्रमांक यापासून तयार झालेले असते. एका वर्कशीटमध्ये एकुण १७१७९८६९१८४ सेल असतात. पहिल्या सेलचे नाव A1 असे असून शेवटच्या सेलचे नाव XFD1048576 असे आहे.

Microsoft-Excel 2019 या टूलचा वापर करुन खालील काही बाबी जलद व अचूक करता येतात.

  1. अंकगणितीय डेटाचे सहज विश्लेषण करता येते.
  2.  मोठ्या प्रमाणावर असलेला डेटा सहज पृथ्थक करता येतो.
  3. अंकगणितीय आणि तार्किक क्रिंया करता येतात.
  4. ॲटोफिल सारख्या फंक्शन मुळे हजारो गणिते एका क्लिकवर करता येतात, त्यामुळे श्रम व वेळ वाचतो.
  5.  फार्म्युलाज् वापरुन शेकडो क्रिया सहज करता येतात.
  6.  कॉलम-रोच्या मदतीने डेटातील विविधता तुलनात्मक पध्दतीने सविस्तर मांडता येते.
  7.  चार्टच्या साह्याने डेटा विवरण अधिक चांगल्या प्रकारे सादर करता येते.
  8.  प्रत्येकाला आपले मासिक व वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्यास उपयुक्त आहे.
  9.  बील फॉरमॅट तयार करता येतात.
  10. डेटा इम्पोर्ट व एक्स्पोर्ट करता येतो.

वरील सर्व बाबी Microsoft-Excel 2019 चा उपयोग करुन खूप चांगल्या प्रकारे करता येतात. यासाठी युजरला काही प्राथमिक गणितीय सुत्रे माहीत असणे आवश्यक आहेत ती पुढीलप्रकारे –

Excel Formulas: 

बेरीज           =sum(Cell Selection)

टक्केवारी         =ज्याची X 100/पैकी

शेकडा टक्केवारी   =ज्याची X टक्केवारी

किंमत           = Price X Qty.

वजाबाकी         =cell-cell

गुणाकार         = cell * cell

भागाकार         =cell/cell

निकाल          =if(and(Sub1>=35,Sub2>=35,LastSub>=35),"Pass","Fail")

श्रेणी            =if(or(per>=60),"A","B")

बहुश्रेणी                    =if(per>90,A+,if(per>80,A,if(per>70,B+,if(per>60,B,if(per<60,C)))))

सरासरी =Average(cell Selection)

किमान संख्या - लहानात लहान संख्या =min(Cell Selection)

कमाल संख्या - मोठयात मोठी संख्या =max(Cell Selection)

UPPER (अक्षरे कॅपिटल दर्शविणे)     =UPPER(cell selection)

lower (अक्षरे स्मॉल दर्शविणे)        =lower(cell selection)

Count (संख्या मोजणे)              =count(cell selection)

len (अंक/अक्षरे मोजणे)             =len(Cell Selection)

Insert Date                      =Today()

Current System Date and Time  =now()

Today’s Date                    = ctrl + ;

Today’s Time                   = ctrl + :

अक्षरे कॅपिटल दर्शविणे              =UPPER(Cell Selection)

अक्षरे स्मॉल दर्शविणे               = lower(Cell Selection)

संख्या मोजणे                     = count(cell Selection)

अंक व अक्षरे मोजणे                =len(cell selection)