Mr. Sadashiv Kisanrao Dhakne

Monday, March 31, 2025

प्रकरण क्र. ७ - किबोर्ड अर्थात कळफलक व त्यावरील बटणे -

  प्रकरण क्र - किबोर्ड अर्थात कळफलक  त्यावरील बटणे -

किबोर्ड म्हणजे काय?

किबोर्डला मराठीमध्ये कळफलक असे म्हणतात. संगणकामध्ये अंक, अक्षरे आणि चिन्हांमध्ये असणारी माहीती इनपूट करण्यासाठी याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो.    

व्याख्या –    अंकअक्षरे आणि विविध चिन्हे यांच्या विशिष्ट मांडणीला किबोर्ड असे म्हणतात. किबोर्ड हे एक इनपूट उपकरण असून मजकूर टंकलिखित करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

किबोर्डची मांडणी –

    जगातील सर्व बाबी वेळेनुसार बदलत गेल्या परंतु किबोर्डवरील अक्षरांची जागा  मांडणी आजपर्यंत बदलली नाही. किबोर्डवर अक्षरांची मांडणी ही QWERTY क्वेर्टी पद्धतीची असते. म्हणजेच अक्षरांची मांडणी  Q W E R T Y ...... अशा क्रमाने केलेली असते.

किबोर्डचे बेसीक प्रकार –

अ.           स्टँडर्ड किबोर्ड -  १०४ बटणे असतात. 

               या किबोर्डवर संगणकावर काम करण्यास उपयुक्त अशाच आवश्यक बटणांचा समावेश असतो. या बटणांची संख्या १०४ असते. यावर एकुण १४ प्रकारच्या बटणांचा समावेश होतो.

आ.          मल्टिमिडीया किबोर्ड – १०४ पेक्षा अधिक बटणे

    या किबोर्डवर संगणकावर काम करण्यास उपयुक्त आवश्यक बटणांच्या व्यतिरिक्त मल्टिमिडीया ऑपरेट करण्यासाठी इतर बटणांचाही समावेश केलेला असतो. उदा. मिडीया प्लेअर चे प्ले बटण, प्रिव्हीयस, फॉरवर्ड, पॉज, होम बटण इ. यांची संख्या ही निश्चित नसते. ती कमी – जास्त असू शकते.

किबोर्डचे काळानुसार पडलेले प्रकार –

अ.   पारंपरिक किबोर्ड (Traditional Keyboard) – पारंपरिक पध्दतीने सुरुवातीपासून आजपर्यंत चालत आलेला हा किबोर्ड ज्यामध्ये काळानुसार फारसा बदल झालेला नाही. हा आयताकृती, ठरीव साच्याचा असतो.

आ. एरगॉनॉमिक किबोर्ड –  संगणकावर जास्त वेळ काम करणाऱ्यांसाठी विशेष करुन हा किबोर्ड डिझाईन केलेला आहे. मजकुर टाईप करतांना मनगटावर ताण पडू नये यासाठी या किबोर्डमध्ये विशेष काळजी घेण्यात आलेली आहे.

इ.      वायरलेस किबोर्ड-  केबल नसलेला बॅटरीच्या साह्याने चालणारा हा किबोर्ड आहे. संदेश वहन करण्यासाठी हा वायफाय तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सेन्सरच्या साह्याने मजकुर संगणकाला पुरवितो. या किबोर्डला वायर नसल्यामुळे थोडया अंतरावरुनही इनपूट देता येतात.

ई.    फ्लेक्झीबल किबोर्ड – लवचिक किबोर्ड  - ज्या लोकांना सतत फिरते काम करावे लागते, अशा लोकांना पारंपरिक किबोर्ड सोबत बाळगणे हा अडचणीचा विषय होतो, त्यावर उपाय म्हणून या किबोर्डची निर्मिती करण्यात आली. ज्यामुळे किबोर्डची गुंडाळी/घडी करता येते. 

उ.    पीडीए /थंम्ब किबोर्ड – सर्वसाधारणपणे

ऊ.   व्हर्च्युअल किबोर्ड – हा भौतिक किबोर्ड नसतो.

किबोर्डवरील बटणांचा परिचय (104)

फंक्शन कीज् (Function keys - 12)

टाईपरायटर कीज् (Typewriter Keys 46) - अंकअक्षरे आणि विविध चिन्हे यांचा अंतर्भाव होतो.

कम्बाईन कीज् शॉर्टकट कीज् (Ctrl, Shift, Alt) (6)

टॉगल कीज् / Toggle keys - (Caps Lock, Scroll Lock, Num Lock) (3)

.ॲरो कीज् (Arrow Keys) (4) ( Navigation keys)

न्युमेरिक किज् नम पॅड (16) यामध्ये अंकगणितीय क्रिया करण्यासाठी लागणाऱ्या विविध चिन्हांचा समावेश असतोअंकासह ते  पर्यंत.

स्पेशल पर्पज कीज् - ( Special Purpose Keys) (8 Buttons)

            Home - End

            Insert – Delete 

            pgup  - pgdown

            print screen - pause

एंटर बटण (2)

एस्केप बटण (Esc) (1)

१०टॅब की (Tab key)   (1)

११स्पेस बार (Space Bar) (1)

१२बॅक स्पेस (Back Space) (1)

१३. विंडो की (Window key) (1)

१४राईट क्लीक बटण (1)

 

Keyboard Shortcut

1. New file - (Ctrl + N)      नविन फाईल तयार करण्यासाठी

2. Open file ( Ctrl + O)      एखादी फाईल ओपन करण्यासाठी

3. Save file ( Ctrl + S)             एखाद्या प्रोग्राममध्ये केलेले काम जतन करण्यासाठी

4. Print (Ctrl + P)          एखाद्या फाईलची प्रिंट घेण्यासाठी

5. Exit ( Alt + F4)                  एखादा प्रोग्राम बंद करण्यासाठी

6. Undo (Ctrl + Z)                 एखादी क्रिया नको असल्यास परत मागे घेण्यासाठी

7. Redo ( Ctrl + Y)                 एखादी परत मागे घेतलेली क्रिया पुन्हा करण्यासाठी

8. Cut ( Ctrl + X)                  एखादा निवडलेला घटक कॉपी करुन काढून टाकण्यासाठी

9. Copy ( Ctrl + C)                 एखादा निवडलेला घटक कॉपी करण्यासाठी

10. Paste ( Ctrl + V)             एखादा कॉपी केलेला भाग दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करण्यासाठी

11. Goto ( Ctrl + G)         डॉक्युमेंटमध्ये एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी जसे पेज, ओळ, बुकमार्क

12. Find (Ctrl + F)              एखादा शब्द किंवा नाव शोधण्यासाठी

13. Find Next ( F3)             एखादा शोधलेला शब्द पुढे शोधण्यासाठी

14. Replace (Ctrl + H)         एखाद्या शब्दाच्या ठिकाणी दुसरा शब्द बदलण्यासाठी

15. Select All ( Ctrl + A)      एखादा डॉक्युमेंटमधील सर्व मजकुर सलेक्ट करण्यासाठी

16. Date and Time (F5 in notepad)         नोटपॅड प्रोग्राममध्ये दिनांक आणि वेळ घेण्यासाठी

17. Refresh ( F5 on Desktop only)         डेस्कटॉपवर रिफ्रेश करण्यासाठी

18. Bold (Ctrl + B)                 सलेक्ट केलेला मजकुर बोल्ड म्हणजेच घट्ट करण्यासाठी

19. Italic ( Ctrl + I)                 सलेक्ट केलेला मजकुर इटालिक म्हणजेच तिरपा करण्यासाठी

20. Underline (Ctrl + U)         सलेक्ट केलेला मजकुराला अधोरेखांकित करण्यासाठी

21. Left Align ( Ctrl + L)          मजकुर पानाच्या डाव्या बाजूला लिहीण्यासाठी

22. Center Align ( Ctrl + E)     मजकुर पानाच्या मध्यभागी लिहीण्यासाठी

23. Right Align ( Ctrl + R)         मजकुर पानाच्या उजव्या बाजूला लिहीण्यासाठी

24. Justify Align ( Ctrl + J)         मजकुर पानावर ब्लॉक स्टाईल म्हणजे ठोकळा पध्दतीने लिहीण्यासाठी

25. font size grow = (Ctrl +Shift+ < />)         मजकुराचा आकार कमी किंवा जास्त करण्यासाठी

26. menu selection = ( Alt ) हे एकमेव असे कम्बाईन की आहे, की जे कुठल्याही कि सोबत न जोडता ही काम करते, जसे की, केवळ Alt बटण दाबल्यास कुठल्याही प्रोग्रामचा मेनु सलेक्ट होतो.

Title bar Commands Shortcuts

            a. Minimize = (Alt + Space) ओपन असलेली विंडो छोटी करुन टास्कबारवर घेण्यासाठी

            b. Restore Down = (Alt + Space) ओपन असलेल्या विंडोचा आकार कमी करण्यासाठी

            c. Maximize = ( Alt + Space)  रिस्टोअर केलेल्या विंडोचा आकार मोठयात मोठा करण्यासाठी

            d. window size = ( Alt + Space) रिस्टोअर केलेल्या विंडोचा आकार कमी जास्त करण्यासाठी

            e. window move = ( Alt + Space) ओपन असलेली विंडो डेस्कटॉपवर इतर ठिकाणी हलवण्यासाठी

            f. Close - (Alt + Space/ Alt + F4) ओपन असलेली विंडो बंद करण्यासाठी

       

A to Z Shortcuts :

Ctrl + A        = Select All

Ctrl + B        = Bold

Ctrl + C        = Copy

Ctrl + D        = Open Font Window

Ctrl + E        = Center Alignment

Ctrl + F        = Find

Ctrl + G        = Go to

Ctrl + H        = Replace

Ctrl + I        = Italic

Ctrl + J        = Justify

Ctrl + K        = Insert Hyperlink

Ctrl + L        = Left Alignment

Ctrl + M        = Increase Indent

Ctrl + N        = New file

Ctrl + O        = Open file

Ctrl + P        = Print

Ctrl + Q        = Decrease Indent

Ctrl + R        = Right Alignment

Ctrl + S        = Save

Ctrl + T        = New Tab

Ctrl + U        = Underline

Ctrl + V        = Paste

Ctrl + W        = Close Window

Ctrl + X        = Cut

Ctrl + Y        = Redo

Ctrl + Z        = Undo

Function Key Shortcuts :

F1        =  Opens the help menu

F2        =  Rename a file in Windows Explorer

F3        =  Opens the search/find function

F4        =  Alt + F4. Closes the active window

F5        =  Refresh the Internet browser

F6        =  Places the cursor in the browser’s address bar

F7        =  Performs a spelling and grammar check in Word.

F8        =  Select text in Word

F9        =   Update a Word document

F10      =  Maximize the window in Microsoft Word

F11      =  Activates/deactivates the “full screen” mode

F12      = Open “Save As” in Microsoft Word

==========================xx=====================